Thursday, June 26, 2025
Homeसांगलीसाडेचार लाखांची रोकड सांगली बसस्थानकातून चोरीस; गर्दीचा गैरफायदा घेऊन बॅगेमधील पैसे गायब

साडेचार लाखांची रोकड सांगली बसस्थानकातून चोरीस; गर्दीचा गैरफायदा घेऊन बॅगेमधील पैसे गायब

येथील मध्यवर्ती बसस्थानकातून एसटी बसमधून निघालेल्या एका प्रवाशाची चार लाख ७० हजारांची रोकड चोरट्याने चोरीस गेली. याप्रकरणी धनापांडे उचीकाले देवर (वय ४०, विटा, ता. खानापूर) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की देवर हे मूळचे तमिळनाडूचे आहेत. पापड विक्रीच्या व्यवसायामुळे ते विट्यातील सूर्यनगर येथे कुटुंबासमवेत वास्तव्यास असतात. त्यांच्या सासूने बँकेत गहाणवट ठेवलेले त्यांचे दागिने सोडविण्यासाठी पत्नी सौ. आनंदी, मुलगी रितिकासह ते १७ मार्च रोजी आपल्या मूळगावी उसलमपट्टीकडे दागिने सोडविण्यासाठी ४ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन निघाले होते. त्यावेळी पत्नीच्या पर्समध्ये रोकड व कागदपत्रे, मोबाईल चार्जर ठेवला होता.

 

ही पर्स प्रवासी बॅगेत ठेवली होती. दुपारी दोनच्या सुमारास सांगली एसटी स्टँड ते मिरज रेल्वेस्थानक या दरम्यान गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवासी बॅगेमधील ४ लाख ७० हजार रुपयांची रोकड, तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, एटीएम कार्ड अशी कागदपत्रे ठेवलेली पर्स चोरट्याने चोरून नेली. चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -