Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगअमेरिकेकडून मोठ्या युद्धाची तयारी, संपूर्ण जगाला भोगावे लागणार परिणाम

अमेरिकेकडून मोठ्या युद्धाची तयारी, संपूर्ण जगाला भोगावे लागणार परिणाम

गेल्या काही काळापासून अमेरिका आणि रशिया या देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 तासांच्या कालावधील रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दोनदा अणुहल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. यापूर्वी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव यांच्या एका ट्रम्प यांनी रशियाच्या दिशेने अणु पाणबुडी पाठवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आता ट्रम्प यांनी आम्ही अणुयुद्धासाठी तयार आहोत असं विधान केलं आहे.

 

अनेरिका अणु युद्धासाठी तयार

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, रशिया अणुयुद्धाबद्दल बोलत आहे, त्यामुळे आता आम्हालाही तयार रहावे लागणार आहे. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव यांनी अणुहल्लाबद्दल जे म्हटले ते चुकीचे आहे. अणुहल्ला म्हटलं की सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण ते एक मोठे संकट आहे. त्यामुळे तयारी म्हणून मी अणु पाणबुडी रशियाच्या दिशेने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ते बोलले आहेत त्याची कृती ते करणार नाहीत याची खात्री मला करायची आहे.

 

ट्रम्प यांची खास योजना

डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर महत्वाची माहिती समोर आली आहे. सध्या अमेरिकेच्या 2 अणु पाणबुड्या रशियाभोवती फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. पाणबुड्या बॅरेंट्स किंवा नॉर्वेजियन समुद्रात असण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणावरूव संपूर्ण रशियावर हल्ला करणे शक्य आहे. तसेच आवश्यकता असल्यास या पाणबुड्या नाटो देशांच्या नौदल तळांचाही वापर करू शकतात. रशियाने अमेरिकेकडून या पाणबुड्यांबाबत माहिती मागितली होती, मात्र अमेरिकेने कोणतेही उत्तर दिले नाही.

 

रशिया अमेरिकेला वेढण्याच्या तयारीत

अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर रशियाने अमेरिकेला घेरण्यासाठी खास रणनीती तयार केली आहे. रशियाच्या दोन अणु पाणबुड्या उत्तर अटलांटिक महासागरात अमेरिकेभोवती गस्त घालत असल्याची माहिती समोर आली आहे. या पाणबुड्यांमध्ये काही क्षेपणास्त्रे आहेत. या द्वारे अमेरिकेतील फ्लोरिडा, जॉर्जिया, दक्षिण कॅरोलिना, उत्तर कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया, न्यू यॉर्क या राज्यांवर हल्ला केला जाऊ शकतो.

 

रशियाच्या या पाणबुड्यांवर असलेल्या अणु पोसायडॉनच्या स्फोटामुळे समुद्रात मोठा भूकंप होऊ शकतो. ज्यामुळे किरणोत्सर्गी त्सुनामी अमेरिकेच्या किनारी भागाला मोठे नुकसान पोहचवू शकते. रशिया आणि अनेरिकेने आगामी काळात एकमेकांवर अणुहल्ला केला तर याचा परिणाम या दोन्ही देशांसह संपूर्ण जगावर होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -