Friday, January 30, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी, बंडखोर अजूनही सक्रिय

इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी, बंडखोर अजूनही सक्रिय

इचलकरंजी महापालिकेसाठी आज दिवसभरात २२ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले.(withdrawn) यामध्ये पक्षीय उमेदवारांचे बहुतांश डमी अर्ज आहेत. भाजपच्या एका बंडखोर उमदेवाराने आज प्रभाग आठमधून माघार घेतली आहे, तर प्रभाग ९ मधून एका राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवारानेही आपली उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

 

आज भाजपचे बहुतांश बंडखोर उमेदवार माघार घेतील, अशी शक्यता होती, (withdrawn) मात्र फक्त एकाच बंडखोर उमेदवाराने माघार घेतली आहे. त्यामुळे आता उर्वरित बंडखोर उमेदवार माघार घेणार की निवडणूक रिंगणात कायम राहणार हे उद्या (ता.२) स्पष्ट होणार आहे.

 

महायुतीत एकूण १३ ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती होत आहेत. (withdrawn) त्यापैकी काही जागांवरील मैत्रिपूर्ण लढती टाळण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. त्यादृष्टीने यातील कोणता उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर पडणार याकडेही विशेष लक्ष आहे,

 

तर एक-दोन जागा बिनविरोध करण्याच्या हालचाली आज दिवसभर सुरू होत्या. (withdrawn) त्यामुळे बिनविरोधची लॉटरी कोणत्या उमेदवाराला लागणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -