Friday, January 30, 2026
Homeतंत्रज्ञानवारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत...

वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा

रिचार्ज प्लॅनआणि टेलिकॉम कंपन्यांच्या नियमांमध्ये सतत बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.आता डेटा आणि कॉलिंगचे फायदे मिळवण्यासोबतच सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह राहावे यासाठी देखील यूजर्सना रिचार्ज करावा लागत आहे. जर तुमचा रिचार्ज संपला असेल आणि तुम्ही नवीन प्लॅन खरेदी केला नाही तर कंपन्या तुमचे सिम 90 दिवसांत बंद करण्याची शक्यता असते. हीच समस्या निर्माण होऊ नये, यासाठी यूजर्स वारंवार रिचार्ज करत असतात. पण असे अनेक यूजर्स असतात ज्यांना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो. अशा परिस्थितीत यूजर्स कंपनीचे दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करणारे प्लॅन खरेदी करू शकतात. तुम्ही जर आता हे प्लॅन खरेदी केले तर तुम्हाला वर्षभर चिंता करण्याची गरज नाही.

 

जियोचा अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन

 

जिओ त्यांच्या यूजर्सना 3,999 आणि 3,599 रुपये असे दोन अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन ऑफर करतो. 3,999 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G + रोज 2.5GB डेटा, रोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आण 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यासोबत फॅनकोड, जियोहॉटस्टारचे तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शन आणि 18 महिन्यांचे गूगल जेमिनी प्रोचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाणार आहे. 3,599 वाल्या प्लॅनमध्ये फॅनकोड सब्सक्रिप्शन व्यतिरिक्त इतर सर्व फायदे मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

 

एयरटेल अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन

 

जिओप्रमाणेच एअरटेल देखील त्यांच्या यूजर्सना 3,999 आणि 3,599 असे दोन अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन ऑफर करतो. कंपनीच्या 3,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G + रोज 2.5GB डेटा, रोज 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यामध्ये एका वर्षाचे जियोहॉटस्टार आणि परप्लेक्सिटी प्रोचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाणार आहे. तर 3599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटासह रोज 2.GB डेटा, रोज 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. यामध्ये केवळ परप्लेक्सिटी प्रोचे सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे.

 

वोडाफोन आइडिया (Vi) अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन

 

Vi च्या अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅनची किंमत 3599 आणि 3799 रुपये आहे. 3599 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटासह रोज 2.GB डेटा, रोज 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि 365 दिवसाची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. तसेच या प्लॅनच्या एडिशनल बेनिफिटमध्ये रात्री 12 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा, वीकेंड डेटा रोलओवर आणि प्रत्येक महिन्याला 2GB बॅकअप डेटा मिळतो. जर आपण 3799 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोललो तर, 3599 रुपयांच्या सर्व फायद्यांसोबत, यामध्ये एका वर्षासाठी प्राइम लाइटचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -