Thursday, May 7, 2026
Homeमहाराष्ट्रलग्नापूर्वीच गर्भवती, पोटातील बाळ पाडण्यासाठी भयंकर केलं; तरुणीच्या मृत्यूने कुटुंब हादरलं!

लग्नापूर्वीच गर्भवती, पोटातील बाळ पाडण्यासाठी भयंकर केलं; तरुणीच्या मृत्यूने कुटुंब हादरलं!

धुळ्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अविवाहित असलेल्या गर्भवती तरुणीच्या कृत्याने खळबळ उडाली आहे. धुळे शहरापासून जवळच असलेल्या मोघन गावातील 18 वर्षीय अविवाहित तरुणीने गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचं सेवन केल्याने तिचा मृत्यू ओढवला.

 

 

या प्रकरणी मोहाडी पोलिसांत नोंद केली आहे. मृत तरुणी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. विशेष म्हणजे या तरुणीचे गावातील प्रेम संबंध असल्याचे देखील माहिती समोर येत आहे. या प्रेम संबंधातूनच ही तरुणी गरोदर राहिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

 

 

अतिप्रमाणात गर्भपाताच्या गोळ्यांचं सेवन…

 

धुळे तालुक्यातील मोघन गावातील एका 18 वर्षीय मुलीस धुळे शहरातील देवपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टरांनी तपासल्यावर मुलगी गरोदर असल्याचं समजलं. शिवाय 24 आठवड्यांचा गर्भ असताना तिने गर्भपातासाठी बाहेरून गर्भपाताच्या गोळ्या सेवन केलं असल्याची माहिती डॉक्टरांनी तपासणीनंतर कुटुंबीयांना दिली. अधिक प्रमाणात औषधांचं सेवन केल्यानं तिचा रक्तदाब कमी झाला होता आणि तिला झटके येऊ लागले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला शासकीय हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

 

या प्रकरणी मोहाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र ही तरुणी प्रेम संबंधातून गरोदर राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात शहरातील मोहाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी पुढे पोलीस तपासणीमध्ये काय निष्पन्न होतं आणि कुठला गुन्हा दाखल होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -