Saturday, May 9, 2026
Homeकोल्हापूरमुंबई विरूद्ध लखनौ सामन्यावर बेटिंग, कोल्हापुरात नगरसेविकेच्या मुलासह चौघांना अटक; पोलिसांची लॉजवर...

मुंबई विरूद्ध लखनौ सामन्यावर बेटिंग, कोल्हापुरात नगरसेविकेच्या मुलासह चौघांना अटक; पोलिसांची लॉजवर धाड

आयपीएलमध्ये सोमवारी रात्री रंगलेल्या मुंबई विरुद्ध लखनौ यांच्यातील सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. राष्ट्रीय महामार्गावर कागलजवळ विकासवाडीतील एका हॉटेलवर छापा टाकून कारवाई करण्यात आली.

 

अटक केलेल्यांमध्ये मुरगूडच्या नगरसेविकेच्या मुलाचा समावेश आहे.

 

पोलिसांनी या प्रकरणी बेटिंग अड्डामालक अजित बाळासाहेब कोरवी (वय २९, रा. कोरवी गल्ली, इचलकरंजी), एजंट जॉन्सन जेरून फर्नांडिस (३४, मुरगूड, ता. कागल), फारूख नजीर मुल्लाणी (३८, रेंदाळ, ता. हातकणंगले) व जितेंद्र आप्पासाहेब घोडके (५०, चिकोडी, बेळगाव) यांना अटक केली. या सर्व संशयितांकडून रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य असा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः आयपीएलमधील सामन्यांवर बेटिंग घेतले जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली होती. त्यांनी सहाय्यक निरीक्षक सागर वाघ व त्यांचे पथक सोमवारी रात्री कारवाईसाठी पाठवले होते. पथकाने लक्ष्मी टेकडीजवळ विकासवाडी येथील हॉटेलवर छापा टाकला. तेथे संशयित अजित कोरवी मोबाईल ॲपवरून बेटिंग घेत होता.

 

दुपारी शांतता कमिटी बैठक, सायंकाळी बेटिंग

 

संशयित फर्नांडिस मुरगूडच्या नगरसेविकेचा मुलगा आहे. तो सोमवारी दुपारी झालेल्या शांतता समिती बैठकीला हजर होता. कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट घालून वावरणारा जॉन्सन रात्री बेटिंग अड्ड्यावर सापडल्याची मुरगूडमध्ये जोरदार चर्चा होती.

 

एजंट, गिऱ्हाईक ताब्यात

 

संशयित फर्नांडिस बेटिंगसाठी ग्राहक आणत होता. हॉटेलवर बेटिंगसाठी आलेल्या फारूख व जितेंद्र घोडके यालाही ताब्यात घेण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -