Saturday, May 23, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी: कारखान्यातून तीन लाखांचे कापड तागे चोरीला

इचलकरंजी: कारखान्यातून तीन लाखांचे कापड तागे चोरीला

येथील जुना चंदूर रोड परिसरातील कारखान्याच्या उघड्या शेडमधून चोरट्यांनी ३ लाख १८ हजार ६२५ रुपयांचे कापड तागे चोरुन 1 नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आदित्य रविंद्र तावरे (वय २९ रा. महेश कॉलनीजवळ) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आदित्य तावरे हे कापड व्यापारी असून ते कुटुंबासह महेश कॉलनी परिसरात राहण्यास आहेत. त्यांचे जुना चंदूर दुर्गामाता मंदिर परिसरात कारखान्याचे शेड आहे. या शेडच्या नुतनीकरणाचे काम सुरु असून याठिकाणी त्यांनी नुतनीकरणासाठीचे साहित्य व कापडाचे तागे ठेवले होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी कारखान्याच्या शेडकडे गेले असताना तागे ठेवलेल्यापैकी एक थप्पी कमी दिसून आली.

या संदर्भात त्यांनी तेथील कामगारांकडे तसेच बडीलांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्याची खात्री केली असता दोन प्रकारचे एकूण ७२५० मीटरचे ६१ तागे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्याची किंमत १ लाख ३५ हजार १२५ इतकी आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -