तारदाळ ता. हातकणंगले येथे बुधवारी आठवडा बाजारा दिवशी अक्षय पाटील या युवकाने एका अल्पवयीन युवतीचा पाठलाग करीत छेड काढली. तर युवतीकडे संपर्क नंबर मागण्याचा प्रयत्न केला. यावेळी या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच भर चौकात छेड काढणाऱ्या युवकास चांगलाच चोप दिला.
दरम्यान सदरची घटना पोलीसांना समजताच मारहाण झालेल्या त्या युवकास जमावाकडून ताब्यात घेत उपचारासाठी इंदिरा गांधी हॉस्पिटल मध्ये दाखल केले. रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते. तारदाळ परीसरात गर्दीच्या ठिकाणी छेडछाडीचे प्रकार वारंवार घडत असून शहापूर पोलीसांनी अशा रोडरोमीओ युवकांच्यावर जरब बसवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.






