येथे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांच्या संशयावरून एका डेअरीवर अन्न व औषध प्रशासन आणि शहापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पनीरसह विविध दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.
प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने नियम व अटींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत आवश्यक पूर्तता होईपर्यंत उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश संबंधित व्यावसायिकाला दिले आहेत. शहापूर पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार आणि अन्न सुरक्षा अधिकारी आर. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकला.
डेअरीची तपासणी करून पनीर व इतर दुग्धजन्य पदार्थांचे नमुने संकलित केले. हे नमुने अधिकृत प्रयोगशाळेकडे पाठविले असून, अहवाल येण्यासाठी सुमारे २१ दिवसांचा कालावधी लागणार आहे.






