येथील जावाईवाडी परीसरात संजय प्रभाकर हेर्लेकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने खिडकीतून घरात प्रवेश केला. यामध्ये रोख रक्कम व दागिन्यासह ८० हजाराचा ऐवज चोरट्याने पोबारा केला. सदरची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जावाईवाडी परीसरात संजय प्रभाकर हेर्लेकर व त्यांची
पत्नी हे आपल्या कुटुंबिया समवेत राहतात. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हेर्लेकर यांच्या घरात प्रवेश करण्यासाठी खिडकीतून खोलीत प्रवेश केला.
तिजोरीतील रक्कम घेऊन झोपेत असलेल्या हेर्लेकर यांच्या पत्नीचे गळ्यातील मणी मंगळसूत्र हिसडा मारला. यावेळी हेर्लेकर यांनी आरडा ओरडा करताच चोरटा तेथून पसार झाला. यावेळी चोरट्याने घरातील काही बॅगा चोरून त्या पुढे असणाऱ्या शेतामध्ये टाकल्या होत्या. तर संजय हेर्लेकर यांनी पोलीसांना
दुरध्वनीवरून चोरीची माहिती दिली. यावेळी पोलीसांनी मध्यरात्री घटनास्थळी येऊन चोरीच्या घटनेची माहिती घेतली. तर अज्ञात चोरट्यांनी चोरी करताना आजुबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून घेतल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. तसेच चोरट्यांनी महाजन मळ्यातही चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र नागरीकांच्या सतर्कतेमुळे चोरटे पसार झाले. चोरीच्या या घटनेमुळे नागरीकांतून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


