Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनमुलीचं लग्न वाचवण्यासाठी रजनिकांत यांचे प्रयत्न?

मुलीचं लग्न वाचवण्यासाठी रजनिकांत यांचे प्रयत्न?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या विभक्त होत असल्याच्या वृत्तानं एकच खळबळ उडालेली असतानाच आता रजनिकांत यांच्या बाबत एक नवी माहिती समोर आली आहे. रजनिकांत हे धनुषचे (Dhanush) सासरे असून ते आपल्या मुलीचं लग्न (marriage) वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचं बोललं जातंय.

अभिनेता आणि निर्माता धनुष आपल्या सासऱ्यांना नाही कसं म्हणायचं, या विचारात असल्यानं त्यानं रजनिकांत यांची भेट घेणं जाणीवपूर्वक टाळल्याचं सांगितलं जातंय. रजनिकांत (Rajanikant) आपल्या मुलीचा संसार आणि तिचं धनुषसोबतचं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जातंय. मात्र धनुषनं रजनिकांत यांना भेटणं टाळलं, असल्याचाही दावा केला जातोय.

काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर पोस्ट करत धनुषनं आपल्या लग्नाबाबत माहिती चाहत्यांना एकच धक्का दिला होता. ट्विटरवर पोस्ट करत धनुषनं आपल्या पत्नीसोबत विभक्त होण्याच्या आपल्या निर्णयाचा तुम्ही सगळ्यांना आदर करावा, असंही म्हटलं होतं.

18 वर्षांची सोबत, मैत्री, कपल, पॅरेन्ट्स आणि एक दुसऱ्याचे शुभचिंतक म्हणून आम्ही एकमेकांसोबत संसार (marriage)केला. पण आज आम्ही जिथे उभे आहोत, तिथून आमचे मार्ग आता वेगवेगळे झाले आहेत, असं धनुषनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -