Wednesday, July 23, 2025
Homeमनोरंजन1 वर्षानंतर वामिकाची पहिली झलक पाहून नेटकरी म्हणतात, अरे हा तर दुसरा...

1 वर्षानंतर वामिकाची पहिली झलक पाहून नेटकरी म्हणतात, अरे हा तर दुसरा विराट ! ,”बाप तशी लेक”

ताजी बातमी ऑनलाइन टीम

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma )आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) त्यांच्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. मग विराटची काळ्या पाण्याची बॉटल (Black Water) असेल किंवा अनुष्काचे मुक्या जनावरांसाठी असणारे प्रेम. हे सुपर कुल कपल वेगवेगळ्या करणामुळे सोशल मीडियावर नेहमीच त्यांची चर्चा असते. पण सध्या ते त्यांची मुलगी वामिकामुळे चर्चेत आहेत.

सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी वामिकाचा पहिला व्हिडिओ व्हायरल होत आहे. वामिकाच्या जन्मापासून विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचा चेहरा दाखवला नव्हता. विराट आणि अनुष्काने वेळोवेळी फोटोग्राफर्सना वामिकाचे फोटो न काढण्याचे आवाहन होते. पण केपटाऊनमध्ये सुरु असणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान विराट आणि अनुष्काच्या मुलीची पहिली झलक पाहायला मिळाली.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा तिची मुलगी वामिकासह स्टँडवर उभी पाहायला मिळत आहे. तीने काळ्या रंगचा ड्रेस परिधान केला आहे तर गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये वामिका पाहायला मिळत आहे. वामिकाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच तीचा फोटो सर्वसमोर आला आहे. वामिकाचा फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांना आनंद झालेला पाहायला मिळतच आहे. अनेक नेटकऱ्यांनी अनुष्का आणि विराटचे बालपणीचे फोटो देखील कोलाज करुन सोशल मीडियावर टाकले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -