राष्ट्रपतींच्या अंगरक्षक ताफ्यात समाविष्ट असलेला ‘विराट’ (virat horse) हा घोडा आज (दि. २६) निवृत्त झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विराटच्या डोक्यावर थोपटून त्याला निरोप दिला. विराट या घोड्याने १० हून अधिक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला आहे.
७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ‘विराट’ पोहोचला तेव्हा पीएम मोदीही त्याला प्रेमाने रोखू शकले नाहीत. पंतप्रधान मोदींनी विराटला प्रेमाने मिठी मारली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही विराटला कुरवाळलं. वास्तविक, ‘विराट’ हा एकमेव घोडा आहे जो १३ वेळा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळेच ‘विराट’ची आज दिमाखदार पद्धतीने निवृत्ती झाली.
विराट’ची गुणवत्ता आणि सेवा लक्षात घेऊन त्याला अनेकवेळा सन्मानित करण्यात आले आहे. ‘विराट’ राष्ट्रपतींच्या अंगरक्षक कुटुंबात सामील होता आणि त्याला राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा चार्जर म्हणूनही ओळखले जात होते. आर्मी डे २०२२ निमित्त ‘विराट’ला चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्डनेही सन्मानित करण्यात आले आहे. ‘विराट’ हा राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा पहिला चार्जर आहे ज्याला कॉमंडेशन कार्ड देण्यात आले आहे.