Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगठाकरे सरकारकडून आजपासून नवी नियमावली

ठाकरे सरकारकडून आजपासून नवी नियमावली

राज्यात कोरोना लसीकरण मोहिम वेगात सुरू आहे. परिणामी राज्यात कोरोना आटोक्यात आला आहे. कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट दिसून आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोना निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली नवी नियमावली आजपासून लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील 11 जिल्ह्यांना होणार आहे. त्यात मुंबई, पुणे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना होणार आहे. या जिल्ह्यातील सरकारी तसेच खासगी आस्थापना 100 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु होतील. सर्व कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झालेले आवश्यक आहे. राज्य सरकारच्या नव्या आदेशाने चौपाटी, गार्डन सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

काय सुरू होणार…?
– पर्यटन स्थळ पुन्हा सुरू होणार
– सर्व राष्ट्रीय पार्क आणि सफारी
– ऑन लाईन तिकीट बुकिंग होणार
– एस्सल वर्ल्डसारखे पार्क 50 टक्के क्षमतेने
– स्विमिंग पूल,वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु
– हॉटेल,थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
– सलून, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु
– लग्नासाठी 200 जणांना परवानगी
– अंत्यविधीसाठी कोणतीही मर्यादा आली
– सर्व कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेनं परवानगी
– स्थानिक प्रशासनाच्या वेळेनुसार बीचेस, गार्डन, पार्क खुली होणार
– अम्युजमेंट/थीम पार्क 50 टक्के उपस्थितीत खुली होणार
– वॉटर पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के उपस्थिती
– सलून आणि ब्युटी पार्लर च्या नियम प्रमाणे स्पा 50 उपस्थिती
– रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह 50 टक्के उपस्थिती
– भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के उपस्थिती
– खेळाच्या स्पर्धा लोकांची 25 टक्के उपस्थिती
– नाईट कर्फ्यू रात्री 11 ते सकाळी 5

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -