Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रवेगवान कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला अन … ; तीन दिवसांतील तिसरा अपघात

वेगवान कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला अन … ; तीन दिवसांतील तिसरा अपघात

पुणे- जिल्ह्यातील अपघाताचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. मावळ येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर नारायणगाव जुन्नर रोडवर औटी मळा येथे स्काॅर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाल्याच्या घटना ताज्या असतानाच लोणावळ्या – जुना पुणे- मुंबई महामार्गावर आज सकाळी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. तीन दिवसांच्या कालावधीत घडलेली ही तिसरी घटना आहे. खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र साठे मिसळजवळ पुण्यावरून मुंबईकडे अतिवेगाने जाणारा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला त्याच वेळेस खंडाळ्यातून लोणावळच्या दिशेने जाणाऱ्या पॅसेंजर रिक्षाला या कंटेनर ची धडक बसली आहे . हा सर्व अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक दुकानदार आणि लोणावळा शहर पोलीस दाखल होत जखमींना मदत करत रुग्णालयात दाखल केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -