Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगमाजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरातील लाॅकरमध्ये सापडला खजाना, आयकर पथकाला पैसे मोजून संपेनात!

माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरातील लाॅकरमध्ये सापडला खजाना, आयकर पथकाला पैसे मोजून संपेनात!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी सुरू असणाऱ्या सिक्युरिटी वॉल्ट एजन्सी (लॉकर भाड्याने देण्याची सुविधा) वर आयकर विभागाने धाड टाकली. गंभीर बाब म्हणजे या अधिकाऱ्याच्या घरी ७०० लॉकर नोयडा वॉल्टस एजेन्सीने बनवले होते. यातील अनेक लॉकर्समध्ये बेनामी संपत्ती असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती.

आयकर विभागाने टाकलेल्या या धाडीदरम्यान मंगळवारी १० लॉकर उघडले आहेत. हे लॉकर कोणाच्या मालकीचे आहेत याबद्दल स्पष्टता नव्हती. या धाडीमध्ये काल संध्याकाळपर्यंत ५ कोटी ७७ लाख रूपये रक्कम आयकर विभागाला सापडली. रक्कम मोजण्यासाठी आयकर विभागाच्या टीमला तीन मशिनचा वापर करावा लागला. सतत पैसे मोजल्याने हे मशीनही हँग झाले होते. आयकर विभागाच्या नोयडामधील चैाकशी पथकाच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाल्यानंतर ही धाड टाकण्यात आली होती. यानंतर या टीमने संपुर्ण घर ताब्यात घेतले होते आणि तपास सुरू केला होता. पहिल्या दिवशी १६ लॉकरपैकी १४ लॉकरचा तपास करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -