Friday, September 20, 2024
Homeआरोग्यविषयकCorona चे संकट अजूनही संपलेले नाही, तरीही का हटवले जातायंत निर्बंध?

Corona चे संकट अजूनही संपलेले नाही, तरीही का हटवले जातायंत निर्बंध?

ताजी बातमी ऑनलाइन टीम
नव्या ओमिक्रॉन या प्रकाराचा संसर्ग अत्यंत वेगानं होत असल्यानं रुग्णसंख्या प्रचंड वाढली आणि जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट पसरली. आता ही तिसरी लाट आता काहीशी ओसरत असल्याचं दिसत असलं तरी रुग्णसंख्या मोठी आहे. लसीकरण, विषाणू संसर्गानंतर रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण कमी असणं, मास्क, सुरक्षित अंतर, स्वच्छता यांसारखे उपाय, तसंच अन्य निर्बंध यांमुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी कोरोना विषाणू (Corona virus) संसर्ग हा सामान्य आजार मानून, जनतेवरचे निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. यात डेन्मार्क आघाडीवर असून, कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं असूनही तिथल्या सरकारनं मास्क घालण्यासह सर्व कोरोना निर्बंध हटवले आहेत.

असं करणारा तो पहिला युरोपीय देश ठरला आहे. डेन्मार्कसह इतर अनेक देशांनीही निर्बंध हटवण्यासाठी पावलं उचलली असून, आपल्या देशातही त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले आहेत. शाळा सुरू करण्यात येत आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ, ऑफिसेस अशा ठिकाणी उपस्थितीबाबत निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.

निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या प्रचारासाठी शिथिलता दिली आहे. कोरोना(Corona) रुग्णांची संख्या कमी झालेली नसताना देखील हे देश निर्बंध का हटवत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचं उत्तर जाणून घेऊ या. तरुणाने अवघ्या 16 सेकंदासाठी मास्क काढलं अन् झालं लाखोंचं नुकसान; काय आहे प्रकरण डेन्मार्कमध्ये कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले असून, तिथं आता मास्क घालण्याचीही गरज नाही.

नाइट क्लबदेखील उघडण्यात आले असून, तिथं प्रवेशासाठी अॅपची आवश्यकता नाही. तिथलं जनजीवन आता पूर्वीप्रमाणे सामान्य झालं असल्याचं बीबीसीनं म्हटलं आहे. डेन्मार्कपाठोपाठ ब्रिटनमध्येही कोरोना निर्बंध हटवण्यात येत असून, तिथं मास्कची सक्ती रद्द करण्यात आली आहे. कोविड पासची अट रद्द करण्यात आली असून, सर्व जण कार्यालयात जाऊन काम करू लागले आहेत.

इतरही अनेक निर्बंध हटवण्याचा विचार केला जात आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत लॉकडाउन असलेल्या नेदरलँड्सनेही बहुतांश निर्बंध हटवले जात आहेत, तर स्पेनमध्ये कोरोना हा सामान्य फ्लू म्हणून घोषित करण्यात आला आहे. कोरोना निर्बंध हटवण्यामागे काय आहे कारण? इतक्या देशांमध्ये कोरोनाबाबतचे निर्बंध हटवण्याचा हा निर्णय घेण्यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे जगातल्या मोठ्या लोकसंख्येने लशीचे दोन डोसेस घेतले आहेत.

दुसरं म्हणजे ओमिक्रॉन हा प्रकार अधिक धोकादायक मानला जात नाही. त्यामुळे अनेक देशांनी याला एक एन्डेमिक (Endemic) म्हणजेच प्रदेशनिष्ठ आजार मानण्यास सुरुवात केली आहे. एन्डेमिक हा शब्द अशा आजारांसाठी वापरला जातो, ज्यांपासून एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट वर्गात नियमितपणे सुटका मिळणे कठीण असते. उदाहरणार्थ, मलेरिया अनेक देशांमध्ये एन्डेमिक आजार आहे, म्हणजेच तिथे त्यापासून कायमची सुटका होणं कठीण आहे.

तिथल्या नागरिकांना या आजारासहच जगावं लागतं. ‘Omicron चा धोका टळलेला नाही; निर्बंध हटवणं पडेल महागात’, WHO नं सांगितलं कारण कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन हा नवीन प्रकार आता फारसा धोकादायक मानला जात नाही. कारण त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे आता त्याच्यासोबत पुढे जाण्याची मानसिकता तयार होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -