सावधान! तुमच्याकडे असलेले कोरोना सर्टिफिकेट बनावट तर नाही ना? कारण, महाराष्ट्रात कोरोना चाचणीचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी सक्रीय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुजरात हायकोर्टाने याबाबत अत्यंत गंभीर टिप्पणी देत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. एका कैद्याने सादर केलेल्या कोरोना चाचणी प्रमाणपत्रावरून बनावट कोरोना सर्टिफिकेट रॅकेट सक्रीय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कैद्याने कोरोना सर्टिफिकेट महाराष्ट्रातील जळगाव येथून मिळवले असल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
एका खुनाच्या कैद्याने जामिनाची मुदत वाढवून मिळावी यासाठी गुजरात हायकोर्टात सादर केलेले कोरोनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुजरात हायकोर्टाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार पोलिस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी करून 28 फेब्रुवारीला चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कैद्याने हे सर्टिफिकेट महाराष्ट्रातील जळगाव येथून मिळवले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जळगावात कोरोनाचे बनावट प्रमाणपत्र तयार करणारी टोळी सक्रीय असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालय तथा रुग्णालयाच्या आवारात कोरोनाचे बनावट सर्टिफिकेट दिले जात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. याबाबत नुकतीच एका सुरक्षारक्षकावर प्रशासनाने कारवाई केली आहे. अशातच या प्रकाराला दुजोरा देणारी घटना घडली समोर आली आहे. गुजरात हायकोर्टाचे न्यायमूर्ती सोनिया गोकणी आणि न्यायमूर्ती मोना भट्ट यांच्या न्यायपीठासमोर एका खुनाच्या कैद्याच्या जामिनाबाबत गुरुवारी सुनावणी झालीय 10 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या या कैद्याला 12 ऑक्टोबर रोजी आईवर उपचार करण्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला होता.
मंजूर झालेल्या रजेची मुदत संपून देखील हा कैदीत तुरुंगात हजर झाला नाही. तसेच तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याला जामिनाला मुदत वाढ मिळण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. यासाठी त्याने जळगाव येथून मिळालेले कोविड पॉझिटिव्ह सर्टिफिकेट कोर्टात सादर केले. मात्र, कैद्याने सादर केलेल्या कोरोना सर्टिफिकेटवर कोर्टाने संशय व्यक्त केला आहे. कैद्याने सादर केलेल सर्टिफिकेट बनावट असल्याची गंभीर टिप्पणी कोर्टाने दिली आहे. तसेच या प्रकरणाची दखल घेत या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.