Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यविषयकजेवण झाल्यानंतर तुम्हालाही थंडी वाजते, शरीर कंप होते?; जाणून घ्या त्यामागची वैज्ञानिक...

जेवण झाल्यानंतर तुम्हालाही थंडी वाजते, शरीर कंप होते?; जाणून घ्या त्यामागची वैज्ञानिक कारणे

जेवण झाल्यानंतर आपल्या शरीरातील तापमान स्वाभाविक स्वरूपाने बदलत राहते. खरेतर तापमानामध्ये बदल होणे हे काही फारसे गंभीर कारण नाही, परंतु जर तुमच्या सोबतसुद्धा असे प्रत्येक वेळी होत असेल तर यामागची कारणे जाणून घेणे गरजेचे आहे.

काही प्रमाणात कमी कॅलरीचे केलेले सेवन यामुळे आपल्या शरीराला पोषक तत्व तर मिळतात पण त्याचबरोबर आपल्या शरीरातील तापमान नियंत्रण करण्यासाठी सुद्धा कॅलरीची महत्त्वाची भूमिका असते. 2018 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासांतर्गत असे सिद्ध झाले की जे लोक दीर्घकाळापासून जास्त प्रमाणामध्ये किंवा नियंत्रणामध्ये कॅलरीचे डाएट फॉलो करत असतील तर अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये कॅलरीचे प्रमाण आपल्याला नियंत्रणात पाहायला मिळते तसेच अशा व्यक्तींचे शारीरिक तापमान सुद्धा जास्त नसते. त्यांच्या शरीरामध्ये कॅलरीची कमतरता असू शकते आणि म्हणूनच अशा वेळी जेवण केल्यानंतर त्यांना थंडी वाजू लागते.

थंड पदार्थ खाल्ल्याने किंवा पेय प्यायल्याने शरीरातील तापमानामध्ये बदल जाणवू लागतो. IOSR जर्नल ऑफ नर्सिंग अँड हेल्थ सायंसमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार असे सिद्ध झाले आहे की, थंड पाणी किंवा अन्य कोल्ड्रिंक्स प्यायल्याने आपल्या शरीराचे तापमान 5 मिनिटानंतर 0.28 डिग्री सेल्सियस कमी होते आणि यामुळे आपल्या शरीरातील तापमानात आपल्याला फरक जाणवू लागतो.

जेव्हा आपल्या शरीरातील पेशींमध्ये रक्ताचे योग्य प्रमाणात मात्रा उपलब्ध नसते तेव्हा अनेकांना एनिमिया सारख्या आजारा उद्भवण्याची शक्यता असते. आपल्या शरीरातील रक्त पेशी आपल्या फुफ्फुसा जवळ असणाऱ्या सर्व अवयवांना रक्तपुरवठाचे कार्य करत असते. याच्या माध्यमातूनच आपल्या शरीरातील अन्य अवयवांना सुद्धा ऑक्सीजनची मात्रा तसेच पुरवठा देखील होत असतो. PubMed Central मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासा अंतर्गत असे सिद्ध झाले आहे की आपल्याला वारंवार थंडी वाजने हे एनीमियाचे कारण सुद्धा असू शकते. ही समस्या उद्भवणाऱ्या अनेक लोकांना त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुळे सुद्धा अशा प्रकारची समस्या उद्भवू लागते तसेच म्हणूनच अनेकदा काही व्यक्ती थंड पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये कंपण होते याचे प्रमुख कारण म्हणजे तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची कमतरता होय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -