Sunday, December 22, 2024
Homeनोकरीपदवीधरांना नोकरीची मोठी संधी; असा करा अप्लाय…

पदवीधरांना नोकरीची मोठी संधी; असा करा अप्लाय…

तुम्ही पदवीधर आहात आणि सरकारी बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने (BOB) अधिकृत वेबसाईट bankofmaharashtra.in वर 500 जनरलिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जनरलिस्ट ऑफिसर अर्ज कसा करायचा या संदर्भात आम्ही आपल्यासाठी माहिती घेऊन आलो आहे.

जनरलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करू इच्छूक उमेदवार 22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर 5 फेब्रुवारीपासून अर्ज करण्यासाठी लिंक जारी करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची 12 मार्च रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्याना थेट इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येईल.

– उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी bankofmaharashtra.in वेबसाईटवर जावे.
– नोटीफिकेशन – 14 फेब्रुवारी 2022.
– अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2022.
– परीक्षेची तारीख 12 मार्च 2022.

जनरलिस्ट ऑफिसर स्केल-II पदांची संख्या- 500
वेतनश्रेणी 48170 –69810 रुपये.

जनरलिस्ट ऑफिसर स्केल-III पदांची संख्या- 500
वेतनमान- 63840 – 78230 रुपये

शैक्षणिक पात्रता…
जनरलिस्ट ऑफिसर स्केल-II पदासाठी शैक्षणिक पात्रता…
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेली असावी. किंवा सीए / आयसीडब्ल्यूए / सीएफए / एफआरएम असणे आवश्यक. याशिवाय उमेदवाराकडे 3 वर्षांचा अनुभव असावा. अर्जदाराचे वय 25 ते 35 वर्षे असावे.

जनरलिस्ट ऑफिसर स्केल-III पदासाठी शैक्षणिक पात्रता…
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेली असावी. किंवा सीए / आयसीडब्ल्यूए / सीएफए / एफआरएम असणे आवश्यक. याशिवाय उमेदवाराकडे 3 वर्षांचा अनुभव असावा. अर्जदाराचे वय 25 ते 38 वर्षे असावे.

कशी होईल निवड…?
अर्ज केल्यानंतर उमेदवारांची 12 मार्च रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्याना थेट इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येईल.

अर्ज शुल्क…

जनरलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागेल.

  1. जनरल, ईडब्लूएस आणि ओबीसी वर्गासाठी 118 रुपये
  2. एससी-एसटी वर्गासाठी – 118 रुपये
  3. दिव्यांग आणि महिला वर्गासाठी – कोणतेही शुल्क नाही.

असा करावा अर्ज?

  1. उमेदवाराने सर्वात आधी bankofmaharashtra.in वर जावे.
  2. होम पेजवर तुम्हाला career सेक्शन दिसेल.
  3. त्यावर क्लिक केल्यानंतर त्यावर संबंधीत माहिती मिळेल.
  4. विचारलेली आवश्यक माहिती द्यावी लागेल.
  5. अर्जाचे शुल्क जमा करावे.
  6. अर्ज डाऊनलोड करून त्याची काढू शकतात.
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -