तुम्ही 10 वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेने मुंबई डिव्हिजनमध्ये शिकाऊ उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. अप्रेंटिस पदासाठी भरती होत असून 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. 16 फेब्रुवारी 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) – एकूण जागा 2422
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.
उमेदवाराने फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मोटर मॅकॅनिकल /IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स यापैकी कोणत्याही ट्रेडमध्ये ITI चे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
वयोमर्यादा
शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) पदांसाठी अर्ज करू करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 15 ते 24 या दरम्यान असणे आवश्यक.
भरती शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी – 100/- रुपये
मागासवर्गासाठी – फी नाही.
अशी होणार निवड
गुणवत्ता यादीनुसार निवड होणार.
कोणत्या शहरात मिळेल नोकरी?
मुंबई, नागपूर, भुसावळ, पुणे, सोलापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2022
टीप: ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्व नोकरी विषयक बातम्या या विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून खात्री करूनच आम्ही प्रसिद्ध करत असतो. तरीही नजरचुकीने काही नोकरीच्या जाहिराती चुकीच्या प्रसिद्ध होऊ शकतात. यामुळे उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करताना सदर भरतीची खात्री करूनच आपले अर्ज भरावेत. भरतीसाठी कोणत्याही आर्थिक किंवा इतर नुकसानीस ताजी बातमी टीम जबाबदार राहणार नाही. याची उमेदवारांनी नोंद ठेवावी.