तरुणीच्या नावाने वेगवेगळ्या वेबसाईटवर बनावट अकाऊंट तयार करुन त्यावर त्यांच्यासाठी अश्लिल शिव्यांचा वापर करुन तरुणीचा वियनभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी धानोरीतील एका २८ वर्षाच्या तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी केतन बाळकृष्ण सांडभोर (वय ३२, रा. राजगुरुनगर – Rajguru Nagar) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२१ पासून जानेवारी २०२२ पर्यंत सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वेगवेगळ्या वेबसाईटवर फिर्यादी यांचे फेक अकाऊंट तयार केले. त्याचा इंटरनेटच्या माध्यमातून पाठलाग करुन त्या अकाऊंटवर त्यांच्यासाठी अश्लिल शिव्यांचा वापर करुन त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार फिर्यादी यांना आता माहिती झाल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक मगदुम अधिक तपास करीत आहेत.