ताजी बातमी ऑनलाईन टीम
सैराट’ या पहिल्यावहिल्या चित्रपटातून आपली छाप सोडणारा अभिनेता आकाश ठोसरचा आज वाढदिवस. आकाशचा जन्म २४ फेब्रुवारी १९९३ रोजी झाला.
आकाश मूळचा पुण्यातील औंध इथं राहणारा आहे. औंधमधील एसएसव्हीएम शाळेतून त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने पुणे विद्यापिठातून पदवीचं शिक्षण घेतलं.
शिक्षण घेत असताना आकाशने काही नाटकांमध्येही भाग घेतला. त्याला कुस्तीचीही आवड आहे.
नागराज मंजुळे यांनी सैराटसाठी आधी सहकलाकाराच्या भूमिकेसाठी आकाशचं ऑडिशन घेतलं होतं. मात्र त्याच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांनी त्याला मुख्य भूमिकेसाठी घेतलं.
१९६२- द वॉर इन द हिल्स या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने शरीरयष्टीवर विशेष मेहनत घेतली.आकाश सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा तो फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतो.
रिंकू राजगुरूसोबत शेअर केलेल्या फोटोंना नेटकऱ्यांकडून सर्वाधिक लाइक्स मिळाले होते.
आकाश लवकरच ‘झुंड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.