पोटभर जेवल्यानंतर पुढील दोन तास काहीही खाणे टाळा. हलके आणि पचायला सोप्या अन्नाचा आहारात समावेश करा. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि फायबरयुक्त पदार्थ खा.
फायबर युक्त फळे जास्तीत-जास्त प्रमाणात खा. बद्धकोष्ठता टाळण्यास फायबर युक्त फळे मदत करतात. विशेष म्हणजे यामुळे पाचन तंत्र देखील मजबूत राहते.
लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. लिंबू पाणी पिल्यामुळे तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर साचलेली विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते.
जड जेवणानंतर 20 मिनिटे तुम्ही प्रोबायोटिक्स घेऊ शकता. प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. तसेच आतड्यांचे विविध रोगांपासून संरक्षण करते.
फुल जेवण झाल्यानंतर किमान 20 मिनिटे चालणे पचन सुधारण्यास मदत करते. त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.