मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजार समिती व पिंपरीतीललाल बहादुर शास्त्री भाजी मार्केटमध्ये कांदा व बटाट्याची आवक वाढली असून, काद्याचे भाव उतरले आहेत. तर, बटाट्याचा भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत काहीसा वाढला आहे.
मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजारात बटाट्याची 491 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्यापेक्षा 56 क्विंटलहून अधिक आवक झाली आहे. तर कांद्याची आवक 593 क्विंटल झाली असून, गेल्या आठवड्यापेक्षा 212 क्विंटलने वाढ झाळी आहे.
कांद्याच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत क्विंटल मागे 150 रुपयांची घट झाली. तर, बटाटा मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे 250 रूपयांनी भाव वधारला आहे.
रविवारी फळभाज्यांची 2922 क्विंटल आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात 565 क्विंटलची वाढ फळभाज्यांमध्ये झाली. बाजारपेठेत पालेभाज्यांच्या 37020 गड्ड्या दाखल झाल्या आहेत. तर, 1213 क्विंटल फळांची आवक झाली.
पिंपरी व मोशी बाजारपेठेत या आठवड्याचे भाजीपाल्यांचे भाव जवळपास 20 ते 25 रुपये पावशेरच्या दरम्यान होते. भेंडी व गवारचे दर गेल्या आठवड्याप्रमाणे स्थिर होते.रविवार असल्याने बाजारपेठेत ग्राहकांची अधिक वर्दळ असल्याची माहिती भाजीपाला विक्रेत्यांनी दिली.
फळभाज्यांचे किलोचे भाव
कांदा : 30-35, बटाटा : 30-40, लसूण : 100-110, भेंडी : 90-100, गवार : 80-90, गवार (गावरान) : 100, टोमॅटो : 40-45, दोडका : 40-45, हिरवी मिरची (साधी) :40, मिरची (कोल्हापुरी) : 80, मिरची (ढोबळी) : 60-70, दुधी भोपळा : 30, लाल भोपळा: 25, काकडी पांढरी : 30, काकडी गावरान : 40, कारली : 60-70, पडवळ : 65, परवर : 85, फ्लॉवर : 40, कोबी : 35, वांगी : 30-40, वांगी (भरीत) : 30-40, शेवगा : 60-70, गाजर : 25-30, बिन्स : 50