Monday, December 23, 2024
Homeक्रीडाPreity Zinta च्या जुळ्या मुलांनाही चढला IPLचा फिव्हर! सोफ्यावर लेटून असा लुटला...

Preity Zinta च्या जुळ्या मुलांनाही चढला IPLचा फिव्हर! सोफ्यावर लेटून असा लुटला सामन्याचा आनंद

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या सीझनला सुरुवात झाली आहे. देशात सर्वत्र आयपीएलचा फिव्हर  चढलेला दिसतोय. अशातच बॉलिवूड एक्ट्रेस आणि पंजाब किंग्जची मालकिण प्रीती झिंटाने तिच्या जुळ्या मुलांचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये प्रीतीचे दोन्ही मुले सोफ्यावर लेटून समोरिल टीव्हीवर आयपीएलची लढत पाहाताना दिसत आहेत. ‘नवी टीम, नवा कर्णधार आणि नवे फॅन्स’, असं कॅप्शन देखील प्रीतीने फोटोखाली दिले आहे.

46 वर्षाच्या वयात प्रीतीला सरोगेसीच्या माध्यमातून जुळी मुले झाली आहेत. ‘मला आज तुम्हा सर्वांसोबत गुड न्यूज शेअर करायची आहे. जीन आणि मी खूप आनंदी आहे. आम्ही आमच्या जुळ्या मुलांचे जय झिंटा गुडनफ आणि जिया झिंटा गुडनफ या दोघांचे आमच्या कुटुंबात स्वागत करतो, असे प्रीतीने मुलांच्या जन्म झाल्यानंतर लिहिले होते.

आमच्या आयुष्यातील नव्या टप्प्यात पदार्पण केले आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. या अतुलनीय प्रवासात सहभागी झाल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेट्सचे मनःपूर्वक आभार, खूप प्रेम – जीन, प्रीती, जय आणि जिया.

तुम्हाला माहित असेलच प्रीतीने सन 2016 मध्ये तिचा अमेरिकन बॉयफ्रेंड जेन गुडइनफसोबत विवाहबंधनात अडकली होती. विवाहानंतर प्रीती तिच्या वडिलांकडे राहते. आधी प्रीतीचे नाव प्रसिद्ध बिझनेसमन नेस वाडियासोबत जोडण्यात आले होते. दोघे अनेक वर्षे रिलेशनमध्ये होते. परंतु नंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -