Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीसांगलीतील दहशत माजवणारी टोळी ६ महिन्याकरीता तडीपार

सांगलीतील दहशत माजवणारी टोळी ६ महिन्याकरीता तडीपार

मिरज / प्रतिनिधी
सांगली शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दमदाटी, मारहाण यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गणेश सातपुते आणि ओंकार जाधव टोळीस दोन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. सातपुते टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, विनयभंग यांसह ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ओंकार जाधव टोळीवर देखील ०९ गुन्हे दाखल आहेत. या टोळींना तडीपार करण्याचा प्रस्ताव सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी अधीक्षकांकडे दिला होता. प्रस्तावाचे अवलोकन करून पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दोनही टोळीतील १८ जणांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून तडीपार केले.

जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटलाच नाही ; गुन्हा दाखल करण्याचे आदेश

ओंकार जाधव टोळीतील टोळी प्रमुख ओंकार सुकुमार जाधव (वय २९), शुभम कुमार शिकलगार (वय २३) सुज्योत ऊर्फ बापू सुनिल कांबळे (वय २३), आकाश ऊर्फ अक्षय विष्णू जाधव (वय २४) अमन अकबर शेख (वय २०), कृपेश घनःश्याम चव्हाण (वय २९), ऋषिकेश दुर्गादास कांबळे (वय २१), साहिल हुसेन शेख (वय २२), राहुल रमेश नामदेव (वय २९) प्रेमानंद इराप्या अलगंडी (वय ३१) गणेश चत्राप्या बोबलादी (वय २४ सर्व रा. १०० फुटी रोड, गणेशनगर)

तर सातपुते टोळीतील प्रमुख गणेश बाबासो सातपुते ( वय ३३), रोहित बाबासो सातपुते (वय ३२), हैदरअली हुमायुन पठाण (वय ३०), जाफर हुमावून पठाण (वय २९), गणेश सुरेश मोरे (वय २६), निखील सुनिल गाडे (वय ३९) राहुल सावंता माने (वय २९ सर्व रा. रमामातानगर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.गेल्या काही दिवसांपासून सांगली शहरात खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार यांसह अनेक गंभीर घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे.

जाधव टोळीविरुद्ध २०१३ ते २०२२ मध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, बेकायदेशिर जमाव जमवुन मारहाण, दमदाटी व शिवीगाळ करणे, शासकीय कामात अडथळा आणने, असे शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे ०९ गुन्हे सांगली शहर, सांगली ग्रामीण, विश्रामबाग व मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

तर गणेश सातपुते टोळीवर २०१७ ते २०२२ या कालावधीत खून, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, बेकायदेशिर जमाव जमवुन मारहाण, दमदाटी व शिवीगाळ करणे, शासकीय कामात अडथळा आणने, स्त्रियांची छेडछाड करुण विनयभंग करणे असे शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे ०९ गुन्हे सांगली शहर व मंगळवेढा येथे दाखल आहेत. या टोळीतील सदस्य हे कायदा न जुमाननारे आहेत. त्यामुळे या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी करुन, चौकशी अधिकारी तथा उप विभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल तसेच प्रस्तावाचे सुनावणी दरम्यान दाखल गुन्हा, त्यांच्या हालचाली टोळीतील सदस्यांनी दिलेले म्हणणे, या सर्व बाबी विचारात घेऊन, त्यांची सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन दोनही टोळीला तडीपार करण्याचे आदेश दिले.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, अजय सिंदकर, सिध्दाप्पा रुपनर, संजय पाटील, विक्रम खोत यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -