देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे सत्र सुरुच आहे. गेल्या नऊ दिवसांत पेट्रोल-डिझेल आठव्यांदा महागले आहे. आज, बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली. गेल्य 22 मार्चपासून इंधन दरवाढ सुरुच आहे. त्यामुळे पेट्रेलनंतर आता डिझेलने देखील शतक ओलांडले आहे. महाराष्ट्रात डिझेलचा दर 100 रुपये पार झाला आहे. परभणीत डिझेलचा दर प्रतिलिटर 100 रुपयांवर पोहोचलो आहे.
दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोल 101.01 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 92.27 रुपये प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. गेल्या 9 दिवसांत आठव्यादा इंधन दरवाढ झाली आहे. इंधनाच्या दरात दररोज वाढ होत असल्याने सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे. इंधनाचे दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्याचा मोठा परिणाम महागाईवर होत आहे. रिक्षा, टॅक्सीच्या दरात वाढ झाली आहे. त्यात गेल्या आठवड्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी महागला होता. त्यामुळे किचनचे बजेत विस्कळीत झाले आहे.
प्रमुख शहरात असे आहेत आज इंधनाचे दर
पेट्रोल-डिझेलच्या दरात बुधवारी प्रतिलिटर 80 पैशाने वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार राज्यातील प्रमुख शहरात इंधनाचे दर खालीलप्रमाणे राहातील…
– मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 115.04 रुपये तर डिझेल 99.25 रुपयांवर पोहोचले आहे.
– औरंगाबादमध्ये पेट्रोल 115.69 आणि डिझेल 98.40 रुपये प्रति लिटर आहे.
– कोल्हापूरमध्ये पेट्रोल 113.42 तर डिझेल 115.09 रुपये लिटर आहे.
– पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर अनुक्रमे 114.71 आणि 97.46 रुपये इतके आहेत.
– नागपूरमध्ये पेट्रोल 114.96 रुपये लिटर आणि डिझेल 97.73 रुपये प्रतिलिटर इतके आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे दर 108 डॉलर प्रति बॅरलवर खाली आहे. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. गेल्या नऊ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात साडे चार रुपयांनी वाढ झाली आहे.
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यावरून विरोधी पक्षाने केंद्र सरकारला लोकसभेत घेरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाईवर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी मौन सोडले. वाढत्या इंधनाच्या दरावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण करण्यात आले. इंधनाच्या वाढत्या किंमती आपल्यासाठी एक मोठे आव्हान असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. सन 2010-11 पासून 2021-22 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरील सेससाठी केंद्र सरकारने 11.37 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.