Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा

कोल्हापुरात आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा

ताजी बातमी ऑनलाइन टीम

कोल्हापूर शहरातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणार्‍या शिंगणापूर उपसा केंद्रातील पंप बिघडल्याने ए, बी व ई वॉर्ड तसेच संलग्नित उपनगरे, ग्र्रामीण भागाला शुक्रवारपासून (दि. 1) एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दरम्यान, इचलकरंजीलाही एक दिवस आड पाणीपुरवठा होणार आहे.


गेले महिनाभर एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू होता. चार दिवस नियमित पाणीपुरवठा सुरू झाला होता. तोपर्यंत पुन्हा पंप नादुरुस्त झाले आहेत. ए, बी वॉर्ड व त्यास संलग्नित उपनगरे ग्रामीण भागास शुक्रवारी (दि. 1) पाणीपुरवठा होईल. ई वॉर्ड व त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागास शनिवारी (दि. 2) याप्रमाणे एक दिवस आड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पंप दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे मनपाने कळविले आहे.



ए, बी वॉर्ड त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग व शहरांतर्गत येणार्‍या संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, साळोखेनगर टाकीवरील संपूर्ण भाग, जरगनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, कळंबा फिल्टर हाऊसवरील अवलंबून असलेला संपूर्ण भाग, शिवाजी पेठ परिसरातील काही भाग, संपूर्ण मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, गजानन महाराजनगर, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकरनगर, सुभाषनगर पंपिंग स्टेशनवरील अवलंबून असणारा परिसर, शेंडा पार्क टाकीवरील अवलंबून असणारा परिसर, जवाहरनगर, सुभाषनगर पंपिंग स्टेशनवरील संपूर्ण भाग, वाय. पी. पोवारनगर, मिरजकर तिकटी यांचा समावेश आहे.

ई वॉर्ड व संलग्नित भागात संपूर्ण राजारामपुरी 1 ते 13 वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, शाहूमिल कॉलनी, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, साईक्स एक्स्टेंशन, पाच बंगला, कोरगावकर परिसर, राजाराम रायफल परिसर, माळी कॉलनी, मोहल्ला परिसर, छत्रपती कॉलनी, दिघे हॉस्पिटल परिसर, पांजरपोळ, सम—ाटनगर, प्रतिभानगर, पायमल वसाहत, जगदाळे कॉलनी, आयडियल सोसायटी, तोरणानगर, काशीद कॉलनी, माने कॉलनी, एस.टी. कॉलनी, संयुक्त महाराष्ट्र सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतिनिकेतन परिसर, ग्रीन पार्क परिसर, शाहूपुरी 1 ली ते 4 थी गल्ली, व्यापारी पेठ, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल, महाडिक वसाहत, मार्केट यार्ड यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -