Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगआर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ नाही!

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ नाही!

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे (Petrol Diesel Price Hike) सत्र सुरुच आहे. अशामध्ये आजचा दिवस सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. कारण पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये (Petrol Diesel Price) कोणतीही वाढ करण्यात आली नाही. भारतीय तेल कंपन्यांनी (Petroleum companies) आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. या नवीन दरानुसार पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. त्यामुळे आजच्या दिवस का होईना सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोल -डिझेलच्या दरामध्ये सतत होणाऱ्या वाढीमुळे आता अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरीपार केली आहे.

गुरुवारी झालेल्या दरवाढीनुसार, पेट्रोलमध्ये 80 पैशांची तर डिझेलमध्ये सुद्धा 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. तर मुंबईमध्ये मात्र पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 85 पैशांची तर डिझेलच्या दरामध्ये सुद्धा प्रति लिटर 85 पैशांची दरवाढ झाली होती. या दरवाढीनुसार गुरुवारी मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत (Mumbai Petrol Price) 116.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत (Mumbai Diesel Price) 100.94 रुपये झाली आहे. तर दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर (Delhi Petrol Price) 101.81 रुपये आणि डिझेलचा दर (Delhi Diesel Price) 93.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. गेल्या 11 दिवसांत देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेच्या दर 6.40 रुपयांनी महागलं आहे.

देशामध्ये 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर फक्त एक दिवस वगळता इतर सर्व दिवस दरवाढीचे सत्र सुरुच आहे. 1 एप्रिलपर्यंत म्हणजे या 11 दिवसांच्या काळामध्ये पेट्रोल-डिझेल 6.40 रुपये प्रति लिटरने महागले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या दरामध्ये (Crude Oil Price) खूपच वाढ झाली आहे. त्यात रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्च्या तेलाच्या आयात-निर्यातीवर परिणाम झाला आहे. ज्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासर्व कारणांमुळेच भारतामध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -