इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या तेराव्या सामन्यात RCB चा संघ एका टप्प्यावर सामना गमावतोय असं दिसतं होतं. पण अनुभव दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शाहबाज अहमदच्या साथीने सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. सामन्यात संजू सॅमसनच्या (Sanju Samson) राजस्थान संघावर फाफ डू प्लेसिसच्या बँगलोर संघाने ‘रॉयल‘ विजय (RR vs RCB) मिळवला. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत मंगळवारी एक रंगतदार सामना पहायला मिळाला. रोलरकोस्टर सारखे अनेक चढ-उतार या सामन्यामध्ये होते. पण दिनेश कार्तिकने आणि अहमदने सामन्याचं चित्र पालटलं. टी 20 क्रिकेटमधली खरी रंगत या सामन्यामधून अनुभवता आली.
बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटून परतताना कालव्याच्या पाण्यात दोघे वाहून गेले
टी 20 तुम्ही वेगवान सुरुवात करा किंवा धीमी. सामन्याचा नूर पालटण्यासाठी एक-दोन षटक पुरेशी असतात. तेच सामन्यात घडलं. तत्पूर्वी आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसीसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं हेतं. कालच्या RR vs RCB सामन्यानंतर पॉईंट्सच्या टेबलमध्ये बदल दिसून आला. विशेष म्हणजे राजस्थान पराभवानंतरही पहिल्या स्थानी कायम आहे. तर RCB सहाव्या क्रमांकावर गेला असून त्याला चार पॉईंट्स मिळाले आहेत.
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या तेराव्या सामन्यात राजस्थान संघावर फाफ डू प्लेसिसच्या बँगलोर संघाने ‘रॉयल‘ विजय मिळवला. असं असलं तरी राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. तर बँगलोर संघाने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.