Thursday, December 18, 2025
HomeबिजनेसRBI चे पतधोरण जाहीर! रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, रिव्हर्स रेपो रेट...

RBI चे पतधोरण जाहीर! रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, रिव्हर्स रेपो रेट 3.75 टक्क्यांवर

आरबीआयच्या पतधोरणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते अखेर पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये (Repo Rate) कोणताही बदल न करता 4 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. तर आरबीआयने रिव्हर्स रेपो रेटमध्ये (Reverse Repo rate) बदल केला आहे. रिव्हर्स रेपो रेट 3.75 टक्के इतका करण्यात आला आहे. मागच्या वेळी रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के इतका होता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने आपले पतधोरण जाहीर केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गवर्नर शक्तिकांत दास  यांनी पतधोरण जाहीर केले. अपेक्षेनुसार व्याज दरात यावेळी सुद्धा कोणताही बदल करण्यात आला नाही. आरबीआयने रेपो रेटमध्ये (Repo Rate) कोणताही बदल न करता 4 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. तर आरबीआयने रिव्हर्स रेपो रेटमध्ये बदल केला आहे. रिव्हर्स रेपो रेट 3.75 टक्के इतका करण्यात आला आहे. मागच्या वेळी रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के इतका होता. सलग 11 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
 
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘भू-राजकीय संघर्षाचा परिणाम अनेक अर्थव्यवस्थांवर होत आहे. भारतासाठी सुद्धा हा आव्हानात्मक काळ आहे. देशात महागाई दर (Inflation Rate) वाढण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच, ‘यंदा मान्सून (Monsoon) सरासरी राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बाजारातील घडामोडी पाहून धोरणात बदल करण्यात येईल असे देखील ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -