Sunday, July 27, 2025
Homeक्रीडामुंबईच्या संघात दोन धडाकेबाज खेळाडूंची एंट्री..!

मुंबईच्या संघात दोन धडाकेबाज खेळाडूंची एंट्री..!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ सध्या एका विजयासाठी तरसला आहे. मुंबई इंडियन्सची स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील अवस्था अत्यंत वाईट आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामातील 23 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 13 एप्रिल रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने अद्याप विजयाचे खाते उघडलेले नाही.


आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ सध्या एका विजयासाठी तरसला आहे. मुंबई इंडियन्सची स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील अवस्था अत्यंत वाईट आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामातील 23 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 13 एप्रिल रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने अद्याप विजयाचे खाते उघडलेले नाही.

मुंबईने स्पर्धेत आतापर्यंत सलग चार सामने खेळले असून सर्व सामने त्यांनी गमावले आहेत. हा संघ गुणतालिकेत सध्या नवव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) नेतृत्वाखालील पंजाबच्या संघाने उत्तम खेळ दाखवला आहे. पंजाबचा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. पंजाबने चार सामन्यांपैकी दोन सामने त्यांनी जिंकले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

पंजाब किंग्जचा संघ खूपच संतुलित दिसत आहे. लियाम लिव्हिंगस्टन त्यांच्यासाठी वेगाने धावा करत आहे. मात्र, आतापर्यंत भारताचा दिग्गज सलामीवीर शिखर धवनची बॅट अजूनही शांत आहे. तसेच मयंक अग्रवालकडून एकही मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. जॉनी बेअरस्टोने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबकडून पदार्पण केले. अशा स्थितीत संघाला त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. गेल्या तिन्ही सामन्यात अपयशी ठरलेला ओडिन स्मिथ आपली जागा कायम ठेवतो की बाहेर जातो हे पाहणे बाकी आहे. गेल्या तीन सामन्यांत तो अपयशी ठरला आहे.

मुंबईच्या संघात दोघांची वर्णी?
मुंबईला पहिला विजय मिळवण्यासाठी परफेक्ट प्लेइंग इलेव्हन शोधण्याची गरज आहे. मुंबईची फलंदाजी अजूनही चांगली सुरू आहे. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव सातत्याने धावा करत आहेत. तिलक वर्मानेही जबरदस्त खेळ दाखवला आहे. मात्र कर्णधार रोहित शर्माची बॅट शांत आहे. मुंबईसाठी चिंतेची बाब म्हणजे त्याची गोलंदाजी. जसप्रीत बुमराह या मोसमात एकटा पडताना दिसत आहे. बेसिल थम्पीने मुंबईच्या चाहत्यांना निराश केले आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी रोहित टायमल मिल्सला संधी देऊ शकतो. रमणदीप सिंगला संधी मिळाली पण तो छाप पाडू शकला नाही. त्याच्या जागी फॅबियन ऍलनला संधी मिळू शकते. या सामन्यात रोहित अनुभवी कायरन पोलार्ड बसवण्याचा निर्णय घेतो का ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.
पंजाबच्या संघात एक बदल अपेक्षित
पंजाबचा विचार केला तर या संघात बदल होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. मागील सामन्यात वैभव अरोरा चांगलाच महागात पडला. अशा परिस्थितीत मयंक अग्रवाल त्याच्या जागी ऋषी धवनला संधी देऊ शकतो. धवन देखील चांगला गोलंदाज आहे आणि तो खालच्या क्रमांकावर उतरून फलंदाजीत देखील योगदान देऊ शकतो. पंजाबकडे इशान पोरेल आणि संदीप शर्मा यांचेही पर्याय आहेत.

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, फॅबियन ऍलन, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह.

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडिन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, ऋषी धवन/संदीप शर्मा/इशान पोरेल, अर्शदीप सिंग.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -