सोलापूर जिल्ह्या च्या माढा तालुक्यातील भिमानगर येथे पोहण्यास गेलेला १५ वर्षीय मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोहत असताना त्यामच्या हातातील दोरी सुटली. ही घटना बुधवारी (दि.१३) दुपारी २.३० च्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्याय माहितीनुसार, रोहन सुरेश पवार (वय १५) रा.भिमानगर असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. उकाड्याने हैराण झाल्याने अनेक तरुण मुले पोहण्यास जात आहेत. त्याप्रमाणे रोहन हा उजनी धरणाच्या कॅनॉल मध्ये इतर मुलांबरोबर पोहण्यास गेला होता. त्यास पोहता येत नसल्याने तो दोरीस धरून पोहत होता.
मात्र अचानक त्याच्या हातातील दोरी सुटली. आणि त्या.नंतर तो पाण्यात दिसेनासा झाला. स्थानिक नागरिक व मच्छीमारांनी त्याीचा तपास केला, परंतु तो मिळून आला नाही. या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली.
सध्या कॅनॉलला तीन हजार क्यूसेस पाण्याचा प्रवाह सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी केली. त्यापनंतर कॅनॉल मधील पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.