Sunday, December 22, 2024
HomeसांगलीSangli : पोलिस अधिकार्याीची ग्रा.पं. सदस्याला मारहाण

Sangli : पोलिस अधिकार्याीची ग्रा.पं. सदस्याला मारहाण

राजकीय द्वेषातून कुरळप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी काठीने ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील यांच्या डोक्यात जोराचा प्रहार केल्याने सुनील पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर इस्लामपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांना बडतर्फ करावे, अशी मागणी अशोक पाटील, वारणेचे संचालक व्ही. टी. पाटील, सुभाष पाटील, मारूती जाधव, अश्विन पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हा पोलिसप्रमुख, राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, मानवाधिकार आयोग यांना देणार असल्याचेत्यांनी सांगितले.

अशोक पाटील म्हणाले, सोसायटीच्या निवडणुकीनंतर विजयी पॅनेलने गावातून विनापरवानगी मिरवणूक काढली. जाणून-बुजून प्रचार कार्यालयासमोर मिरवणूक थांबवून अर्वाच्य भाषेत आमच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. हे सर्व पोलिस अधिकारी दीपक जाधव यांच्या सहकार्याने सुरू होते. मिरवणूक सुरू असताना एका पोलिसाला दगड लागला. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगविला होता.

ते म्हणाले, लाठीचार्जनंतर अर्ध्या तासाने आमचे कार्यकर्ते घरी निघाले होते. ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील हे आमच्या घराजवळ उभे होते. त्यावेळी जाधव यांनी काठीने सुनील पाटील यांच्या डोक्यात जोराचा प्रहार केला. रक्तबंबाळ होवून घराच्या समोर ते पडले होते. त्यांना उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मारहाणीचा व्हिडीओही आमच्याकडे आहे. पी. आर. पाटील यांच्या दबावामुळे अधिकारी जाधव यांनी खोटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -