रविवारी मोदींची जम्मू काश्मीरमध्ये सभा झाली. त्याच वेळी मोदींच्या सभास्थळापासून बारा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ललिआना गावात हा स्फोट झाला. दरम्यान, हा स्फोट कोणत्याही अतिरेकी हल्ल्याचा किंवा कारवाईचा भाग नव्हता, अशी माहिती स्थानिक वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुरुवातीला दिली होती. मात्र आता याप्रकरणी आरडीएक्स आणि नायट्रेटचा अंश असल्याचं आढळून आल्यानं पोलिसही हादरुन गेले आहेत.
पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ खबरदारी घेत या घटनेची नोंद घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळापासून अवघ्या
१२ किलोमिटर अंतरावर जम्मू काश्मीरच्या ललियाना गावातील एका शेतात ब्लॉस्ट झाल्याची घटना घडली होती. मोदींच्या दौऱ्यादरम्यानच ही घटना घडली होती.
कशाचा तरी स्फोट झाला आहे, हे आवाज आल्यावर लक्षात येताच जम्मूतील यंत्रणा सतर्क झाली होती. त्यांनी तातडीनं या गावाच्या दिशेनं धाव घेतली होता. तेव्हा करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत हा स्फोट कोणत्याही अतिरेकी कारवाईचा भाग नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र मोदींच्या सभास्थळापासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर झालेल्या या स्फोटात चक्क आरडीएक्सचा वापर झाला असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी मोठी कारवाई जवानांनी केली होती. जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या शोधमोहिमेवाळी 24 तासांत जवळपास पाच अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. यात एक जवानही जखमी झाला होता. काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईला म्हणून महत्त्व प्राप्त झालं होतं.