Saturday, July 5, 2025
Homeराजकीय घडामोडीएकाच विधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, राणा दाम्पत्यावर निशाणा

एकाच विधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, राणा दाम्पत्यावर निशाणा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

यांची आज मुंबईच्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी मनसे, एमआयएम नेते अकबरुद्दीन औवेसी, तसेच राणा दाम्पत्यावर निशाणा साधला.

आपण औरंगाबादला संभाजीनगरच म्हणत आलो असल्याचं ते म्हणाले. अकबरुद्दीन औवेसी यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील दौऱ्यादरम्यान औरंगजेबच्या कबरीवर फुलं अर्पण केले होते. त्यांच्या या वागणुकीवर राज्यभरातून टीका केली जात होती. औवेसींच्या या कृत्याची दखल आता मुख्यमंत्र्यांनी देखील घेत शाब्दिक निशाणा साधला.


उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? “संभाजीनगरमध्ये जे काही घडलं. हो मी संभाजीनगर म्हणतो. आहेच ते संभाजीनगर. तिकडे तो औवेसी गेला आणि औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं ठेवून आला.

हे यांचं जे काही चाललं आहे, यांची ए, बी, सी टीम, कुणाला औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कुणाच्या हातामध्ये भोंगा द्यायचा, कुणाच्या हातामध्ये हनुमान चालीसा द्यायची आणि मजा भगायची. काय कारवाई झाली तर त्यांच्यावर होणार आम्ही बोंबलायला वेगळे. आम्ही जाणार टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हे तुमचं शौर्य.

बरं सुरक्षा किती? झेड प्लस”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी(Chief Minister Uddhav Thackeray) टीका केली. “आज महागाई किती वाढली आहे. 1973 साली काँग्रेस सत्तेवर असताना अटलबिहारी वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते.

पेट्रोलची सात पैशांनी दरवाढ झाली होती म्हणून वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते. तो संवेदनशील भाजप पक्ष गेला कुठे? तुम्ही सांगता ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. मग इथे कोण आहे?

ही बाळासाहेबांची शिवसेना नसेल तर तुमचा भाजप तरी अटलजींची राहिला आहे का?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. “आपण खोटू बोलू शकत नाही. खोटं बोलणं हे त्यांच्या हिंदूत्वात बसू शकतं. पण आपल्या हिंदूत्वात बसू शकत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -