Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : डोक्यात रॉड पडल्याने कामगाराचा मृत्यू

धक्कादायक : डोक्यात रॉड पडल्याने कामगाराचा मृत्यू

बारामतीतील एमआयडीसीमध्ये लोखंडी पाइप तयार करणाऱ्या आयएसएमटी कंपनीत सकाळी दहाच्या सुमारास सकाळ शिफ्ट मध्ये काम करत असलेल्या कंत्राटी कामगाराच्या डोक्यात लोखंडी रॉड पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बारामतीतील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संतोष देवकाते (वय ३०) असे मृत्यू झालेल्या कामगारांचे नांव आहे.

यानिमित्ताने कंपनीतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुरेशी सुरक्षा पुरवली नसल्याचा आरोप मृत कामगाराच्या नातेवाईकांनी कंपनी प्रशासनावर केला आहे. प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यानेच ही घटना घडली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -