Monday, December 23, 2024
Homeसांगलीसांगलीत एकावर सुरीने हल्ला; पूर्ववैमनस्यातून घटना

सांगलीत एकावर सुरीने हल्ला; पूर्ववैमनस्यातून घटना

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सांगली; पूर्ववैमनस्यातून बाबासाहेब शाबुद्दीन मुल्ला (वय 55, रा. काळे प्लॉट, शंभरफुटी रोड, सांगली) यांच्यावर सुरीने हल्ला करण्यात आला. त्यांच्या पत्नीलाही धक्काबुक्की केली. बुधवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



राजू शेरीकर, विजय शेरीकर व चार अनोळखी (अजून नावे निष्पन्न नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. जखमी मुल्ला यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या उजव्या हाताच्या बोटावर सुरीचा वर्मी घाव बसला आहे.



मुल्ला यांचा मुलगा जुबेर याचा संशयितांशी काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. बुधवारी सायंकाळी मुल्ला सिव्हिल चौकात उभा होते. त्यावेळी संशयित राजू व विजय शेरीकर तिथे होते. मुल्ला यांना या दोघांना ‘तुमच्या माझ्या मुलाशी काय वाद झाला होता’, अशी विचारणा केली. त्यावेळी राजू व विजय शेरीकर यांनी मुल्ला यांना धक्काबुक्की करुन बघून घेतो, अशी धमकी देऊन निघून गेले.

त्यानंतर मुल्लाही तेथून घरी गेले. रात्री दहा वाजता मुल्ला यांच्या घरात चार अनोळखी घुसले. त्यांनी मुल्ला यांना शिवीगाळ केली. त्यांच्यावर सुरीने हल्ला केला. त्यांच्या पत्नी सोडविण्यासाठी पुढे गेली. संशयितांनी त्यांनाही शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.

शेजारील लोक जमा होताच चारही संशयितांनी पलायन केले. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरा मुल्ला यांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल केला. अजून एकाही संशयिताला अटक करण्यात आलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -