Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : क्रीडा विभागामार्फत जिल्ह्यात १ ते ३ जून कालावधीत फ्री स्टाइल...

कोल्हापूर : क्रीडा विभागामार्फत जिल्ह्यात १ ते ३ जून कालावधीत फ्री स्टाइल कुस्त्यांचे आयोजन

लोकराजा कृतज्ञता पर्व या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हयामध्ये दि. ०१ ते ०३ जून २०२२ रोजी खासबाग येथील कुस्ती आखाडयामध्ये फ्री स्टाईल कुस्ती गटामधील वजन गट जिल्हास्तरीय मुले ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ अशा ९ वजनी गटामध्ये कुस्ती स्पर्धा नॉकआऊट पध्दतीने घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी दिली आहे.

या स्पर्धेतील वजनीगट स्पर्धा ही कोल्हापूर जिल्हातील खेळाडूसाठी मर्यादित आहेत. तसेच प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांक रु. १००००/-, व्दितीय रु. ७०००/-, तृतीय रु. ५०००/ असे बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच खुला गटातील कुस्ती राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन घेणे आहे. या स्पर्धा मुलासाठी ८६ ते १२५ एकच वजनी गटामधे व मुलीसाठी ६५ ते ७६ एकच वजनी गटामधे बाद पध्दतीने कुस्ती स्पर्धा आयोजन केले असून या स्पर्धसाठी प्रथम क्रमाक रु.10000
द्वितीय रु. ७०००/-, तृतीय रु. ५०००/ असे बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

तसेच खुला गटातील कुस्ती राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन घेणे आहे. या स्पर्धा मुलासाठी ८६ ते १२५ एकच वजनी गटामधे व मुलीसाठी ६५ ते ७६ एकच वजनी गटामधे बाद पध्दतीने कुस्ती स्पर्धा आयोजन केले असून या स्पर्धसाठी प्रथम क्रमांक रु. ७५०००/-, व्दितीय रु. ५००००/- तृतीय रु. २५०००/प्रमाणपत्र व शिल्ड प्रदान केले जाईल. या दोन्ही गटाच्या स्पर्धा दिनांक ०१ ते ०३ जून २०२२ रोजी खासबाग मैदान येथे होतील, असे डॉ. साखरे यांनी सांगितले.

दि. १ जून २०२२ रोजी सकाळी ८. ०० वा ते ११. ०० वा. पर्यंत बजने घेणे व दुपारी ३. ०० या पासून स्पर्धेला सुरवात होईल. तसेच या स्पर्धेसाठी यापूर्वी ज्या मल्लानी नांव नोंदणी केलेल्या आहे. व ज्या कुस्ती मल्लानी आज अखेर नांव नोंद केली नाही अशा खेळाडूंनी स्पर्धेच्या ठिकाणी दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८. ०० वा ते ९. ०० वा. पर्यंत आपली नांव नोंदणी करु शकतात. प्रत्येक गटात कमीत कमी ८ खेळाडू आल्याशिवाय तो गट खेळविला जाणार नाही याची कुस्ती खेळाडूंनी नोंद घ्यावी, असे ही डॉ. साखरे यांनी स्पष्ट केले.

कुस्ती स्पर्धा जिल्हास्तर व राज्यस्तर आयोजन असल्याने खेळाडूंना एकाच वजनीगटाच्या स्पर्धेत सहभागी होता येईल. कुस्ती स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कार्यालयातील श्री. प्रवीण कोढावळे, कुस्ती क्रीडा मार्गदर्शक (९८२३७९२८७९) श्री. बालाजी बरबडे, क्रीडा अधिकारी (९६७३४५१११५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. साखरे यांनी केले आहे.
स्पर्धेच्या ठिकाणी १ जून रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -