ताजी बातमी ऑनलाईन टीम
श्रीगोंदा : गट-गण रचनेच्या आराखड्यात पिंपळगाव पिसा हा सातवा गट अस्तित्वात येणार असून, जगताप, नागवडे, पाचपुते यांच्यासाठी सोयीचे गट तयार झाले आहेत. जिल्हा परिषदसाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना; मात्र पंचायत समितीवर समाधान मानावे लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर, आता गट आणि गण रचना अस्तित्वात येत आहे. अर्थात या गट आणि गण रचनेसाठी हरकती घेतल्या जाणार आहेत.
पिंपळगाव पिसा गटाची या आराखड्यात निर्मिती झाल्याने माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉ. प्रणोती जगताप यांच्यासाठी हा गट सोयीचा तयार झाला आहे. पिंपळगाव पिसा जगताप यांचे गाव असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक हातात असणार आहे. जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्या कल्याणी लोखंडे यांची मात्र या गटाच्या निर्मितीमुळे अडचण झाली आहे. अर्थात लोखंडे यांच्यासाठी जगताप ऐनवेळी वेगळा निर्णय घेऊ शकतात.