Sunday, December 22, 2024
HomeइचलकरंजीIGM रुग्णालयातील साफ सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपीं कामावर घ्यावे यासाठी धरणे आंदोलन...

IGM रुग्णालयातील साफ सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपीं कामावर घ्यावे यासाठी धरणे आंदोलन ; प्रश्नाचा भडिमार आंदोलकांचे अश्रू अनावर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इचलकरंजी शहरातील मनसेच्या कामगार सेना वतीने IGM रुग्णालयातील साफ सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपीं कामावर घ्यावे यासाठी धरणे आंदोलन केले तसेच वैद्यकीय अधीक्षक माळी यांना घेराव घालून त्यांची गाडी अडवण्यात आली व आंदोलकांनी त्यांच्यावर प्रश्नाचा भडिमार केला तर काही आंदोलकांचे अश्रू अनावर झाले आम्हाला कायमस्वरूपीं कामावर घ्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली.




शहरातील IGM रुग्णालयामध्ये कोरोना च्या काळामध्ये कॉन्टॅक्ट बेसवर सफाई कर्मचारी भरवण्यात आले होते गेल्या दोन वर्षापासून या सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णांची सेवा केली आहे त्यावेळी रुग्णाचे नातेवाईक सुद्धा रुग्णाच्या जवळ येत नव्हते त्या काळात या सफाई कर्मचाऱ्यांनी रुग्णालयांमध्ये चांगल्या पद्धतीने काम केले आहे.



कोरोना महामारी कमी झाल्यानंतर शासनाने कॉन्टॅक्टस घेतलेल्या कामगारांना पुन्हा कमी केले आहे गेल्या सहा महिन्यापासून मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे आज शहरांमध्ये रुग्णालया बाहेर मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माळी यांना घेराव घालण्यात आला व त्यांची गाडी अडवण्यात आली व त्यांना प्रश्नाचा भडिमार करण्यात आला यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी भरती करून घ्यावे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली त्यावेळी डॉक्टर माळी यांनी सांगितले ही न्यायप्रविष्ट बाब आहे.

राज्य सरकार दरबारी तुमचे प्रश्न मी मांडू असे आश्वासन दिले यावेळी महिला आंदोलकांनी गाडी अडवून त्यांचा निषेध व्यक्त केला यावेळी पोलीस व महिला आंदोलकांमध्ये बाचा बाची चा प्रकार घडला ज्या साफसफाई करणाऱ्या महिलाचे डोळ्यात अश्रू अनावर झाले होते आम्ही गेले तीन वर्ष पुर्ण कोरोना काळामध्ये काम केले आहे आता आम्हाला कोणी कामावर घेत नाही आम्हाला कायमस्वरूपी कामावर रुग्णालयात रुजू करून द्यावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण बनले होते डॉक्टर अधीक्षक यांच्या गाडी समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना बाजूला केले आहे .

जर येत्या आठ दिवसांमध्ये निर्णय नाही झाला तर आम्ही मनसे स्टाईल ने उत्तर दिले जाईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे या आंदोलनादरम्यान रवी गोंदकर महेश शेंडे योगेश दाभोळकर दिपाली भंडारे हेमा सावनूर आदीजण उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -