ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली; सांगली शहर आणि परिसरात गांजा विक्री
करणाऱ्या चार टोळ्या सक्रिय आहेत. यामध्ये गुन्हेगारांची मोठी टोळी कार्यरत आहे. या टोळ्यांना मिरजेतील सराईत गुंडाकडून गांजाचा पुरवठा होत आहे. एक ग्रॅमची पुडी दीडशे रुपयाला विकली जात आहे.
जत आणि कर्नाटकातून गांजाची जिल्ह्यात तस्करी होत असल्याचे यापूर्वीच पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. कर्नाटकातील अनेक भागांत गांजाची शेतीच पिकवली जात आहे. तेथील काही गुन्हेगारांच्या संपर्कात मिरजेतील अनेकजण असतात. त्यांच्याकडून शंभरफुटी रस्त्यावरील एका सराईत टोळीला गांजा पुरविला जातो.
या टोळीत आठ गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यानंतर हे गुन्हेगार शहरातील अन्य टोळ्यांना त्याचा पुरवठा करतात. दररोज 25 ते 30 किलो गांजा विकला जात आहे. मोबाईलवर संपर्क साधून विक्रीचा व्यवहार केला जातो. एक ग्रॅमची पुडी दीडशे रुपयाला विकली जाते. तरुणांची पिढी गांजाच्या नशेत वाहत केली आहे. बंद पडलेल्या शाळा, स्मशानभूमी, पडकी बांधकामे, नदीकाठी, झाडा-झुडूपात गांजा ओढणारे तरुण बसतात. नशा केली की मग त्यांची पावले आपसूकच गुन्हेगारीकडे वळत आहेत. नशेसाठी मग कोणताही गुन्हा करण्यास मागे-पुढे पाहिले जात नाही.
गेल्या काही महिन्यांत शहरात घडलेल्या घटनांत संशयितांनी गांजाची नशा करूनच गुन्हा केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सांगलीच्या कारागृहातही काही गुन्हेगारांना गांजाची पुडी फेकण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाने कारागृहाच्या तटरक्षक भिंतीवर पत्रे मारुन उंची वाढवून घेतली आहे.
सांगलीत गांजा विक्रीच्या चार टोळ्या?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -