Saturday, July 5, 2025
Homeमनोरंजन'श्रीवल्ली' रश्मिका मंदाना रणबीरवर नाराज!!

‘श्रीवल्ली’ रश्मिका मंदाना रणबीरवर नाराज!!

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिला आता अख्खा देश ओळखतो. ‘पुष्पा’ची ही श्रीवल्ली लवकरच बॉलिवूड डेब्यू करतेय. बॉलिवूडच्या एक नाही तर तीन चित्रपटात ती झळकणार आहे. सध्या ती रणबीर कपूरसोबत ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. मनालीतील चित्रपटाचं एक शूटींग शेड्यूल नुकतंच पूर्ण झालं. पण या शूटींगदरम्यान रणबीर कपूर (ranbir kapoor)जे काही वागला, त्याने श्रीवल्ली’चांगलीच वैतागली आहे. एका मुलाखतीत खुद्द तिनेच हा खुलासा केला.

ती म्हणाली, अॅनिमलच्या शूटींगदरम्यान मी खूप नर्व्हस होते. याचं कारण होतं (ranbir kapoor) रणबीर कपूर. पहिल्यांदा लुक टेस्टदरम्यान मी त्याला भेटले, तेव्हा मी प्रचंड घाबरले होते. पण रणबीर माझ्याशी अगदी मित्रासारखा वागला आणि हळूहळू मी । कम्फर्टेबल झाले. यानंतर शूटींग सुरू झालं आणि सेटवर रणबीरनं मला खूपचं वैताग आणला. तो सेटवर मला सारखा मॅम… मॅम…म्हणून बोलावायचा. त्यामुळे मी त्रासले होते. संपूर्ण इंडस्ट्रीत मॅम म्हणून बोलवणारा रणबीर एकटा आहे. त्याने मला मॅम म्हणावं, हे मला अजिबात आवडत नाही. आता रणबीर व माझी खूप चांगली मैत्री झाली आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रश्मिकाकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या ‘अॅनिमल शिवाय तिच्याकडे अनेक चांगले प्रोजेक्ट आहेत. लवकरच ती अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचं शूटींग अद्याप सुरू झालेलं नाही. पण लवकरच ते सुरू होणार आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू’ या चित्रपटात ती झळकणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबतही ती काम करतेय. ‘गुडबाय’ या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. थलापती विजय स्टारर चित्रपटातही ती दिाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -