Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत 'ओपनबार ची वाढती समस्या ; मोकळी मैदाने,जागा ओपनबारचे प्रस्थ वाढले.

इचलकरंजीत ‘ओपनबार ची वाढती समस्या ; मोकळी मैदाने,जागा ओपनबारचे प्रस्थ वाढले.

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शहरातील अनेक मोकळ्या जागा, मैदाने, सुनसान रस्ते, पडक्या इमारती आदि ठिकाणी ओपनबारचे प्रस्थ वाढत चालले आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. मद्यप्राशन केल्यानंतर शिवीगाळ, मारामारी, पूर्ववैमनस्यातून खूनी हल्ला आदि घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. या विरोधात पोलिस विभागामार्फत कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई जुजबी स्वरूपात असल्याने शहरातील ओपनबार खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे.



इचलकरंजी शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामध्ये किरकोळ मारामारी, चोरी, खुनाच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्याला अनेक कारणे असल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये वाढते ‘ओपनबार’ सुध्दा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर शहर परिसरातील अनेक सुनसान रस्ते, मोकळ्या जागा, आडोसे, पडीक इमारती, शेती परिसर, शाळांची मैदाने आदि ठिकाणी ओपन बारला ऊत येतो.



कोणाच्या नजरेत पडू नये आणि कमी खर्चामध्ये जादा नशा करण्याच्या हेतूने मद्यपीकडून सर्रास ओपनबारचा वापर करताना दिसून येत आहे. मात्र अशा ओपनबारमुळे परिसरातील नागरिकांना विशेषत: महिलावर्गाला वाढता त्रास सहन करावा लागत आहे. रात्री अपरात्री बाहेर पडताना अनेक संकटाना तोंड द्यावे लागते. मद्यप्राशन केल्यानंतर दारूच्या बाटल्या फोडणे, इतर साहित्य इतरत्र टाकून देणे, या प्रकारामधून काहीवेळेला हाणामारीचे प्रसंग घडतात. त्यामधून खुनाच्या गंभीर घटना सुध्दा घडल्या आहेत. बऱ्याचवेळा मद्यप्राशन केल्यानंतर मित्रा-मित्रामध्येच हाणामारी झाल्याच्या घटना आहेत. काहीवेळेला पोलिस खात्याकडून छापा टाकून कारवाई केली जाते. मात्र पुन्हा त्याचठिकाणी राजरोसपणे मद्यपी खुल्या जागेचा वापर करताना दिसून येत असतात. तेव्हा वाढत्या गुन्हेगारीचें कारण असलेल्या ओपनबार कायमबंद ‘क्लोज करण्यासाठी पोलिस खात्याने अॅक्शन घेणे आवश्यक बनले असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -