Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी; विधवा महिला पुनर्विवाह साठी 'येथे' मिळणार अनुदान

इचलकरंजी; विधवा महिला पुनर्विवाह साठी ‘येथे’ मिळणार अनुदान

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दत्तवाड येथील ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. गावातील विधवा महिला पुनर्विवाह करीत असेल तर ग्रामपंचायतीतर्फे ग्रामनिधीतून संबंधित महिलेला २५ हजार रुपये व यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्यावतीने ११ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याचा ठराव केला.


ग्रामसभेत संभाव्य महापूर नियोजन, पेयजल योजना, प्लास्टिक बंदी आदी विषयांवरही चर्चा केली. संभाव्य महापुराची शक्यता लक्षात घेऊन पुराच्या नियंत्रण रेषेत येणाऱ्या नागरिकांनी वेळीच जनावरे व कुटुंबासहित सुरक्षित स्थळी राहण्याची व्यवस्था करून घ्यावी, अशी सूचना मांडली. सरपंच चंद्रकांत कांबळे, उपसरपंच रुपाली पोवाडी, प्रभारी ग्रामसेवक वाघमोडे, पोलिस पाटील संजय पाटील, डी. एन. सिदनाले, नूर काले, लाला मांजरेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -