ताजी बातमी ऑनलाईन टीम
छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे त्यांना अभिवादन विविध राजकीय सामाजिक नगरपालिका प्रशासन यांनी अभिवादन करण्यात आली यावेळी दिवसभरामध्ये छत्रपती शाहू महाराज यांना मानवंदना देण्यात आली शाहू महाराजांच्या पुतळ्याला आज विविध पक्षाच्या आजी-माजी आमदार नगरसेवक यांनी अभिवादन केले छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम केला आहे .
शाहू महाराजांनी जे कार्य केले आहे इथून पुढे शंभर वर्ष त्यांची कार्याची दखल घेतली जाईल असे प्रत्येक राजकीय नेते मडळींनी घेतले आहे तसेच शाहू महाराज पुतळ्याजवळील असणाऱ्या दरवर्षीप्रमाणे अन्नपूर्णा या हॉटेल मालकाने चहा-नाश्ता शाहू जयंतीनिमित्त मोफत ठेवण्यात आला होता यावेळी हजारो शाहू प्रेमींनी या नाश्ता त्याचा आस्वाद घेतला आहे शाहू महाराजांनी दिलेली शिकवण गोरगरीब जनतेसाठी मोलाची असते याचा अनुषंगाने अन्नपूर्णा मालक यांनी हा उपक्रम दरवर्षी सुरू ठेवला आहे त्यांच्या या कार्याचे कौतुक सर्व स्तरातून होऊ लागले आहे तसेच शहरामध्ये आज शाहू जयंती मोठ्या उत्साहात पार पडली