Monday, December 23, 2024
Homeसांगलीमिरजेत घाट रोडला चिखलाचे साम्राज्य..!नागरिकांचे जीवन धोक्यात..!

मिरजेत घाट रोडला चिखलाचे साम्राज्य..!नागरिकांचे जीवन धोक्यात..!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मिरजेत घाट रोड येथे हायवेचे काम सुरु आहे.तिथे दिलीप बिल्डकोन यांच्या डंपरची वाहतुक मुरुम माती करत आहे.पण त्यांची माती मुरुम ही रोडवर पडत असल्याने या रोडवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.आणि वरुन पाऊस असल्याने चिखल झाला आहे.या चिखलातून दुचाकी घसरुन पडत आहेत.त्यामुळे याकडे महापालिकेचे ही लक्ष्य नसल्याचे दिसून येत आहे.यात दुचाकी पडत असल्याने नागरिकांचे जीवन धोक्यात आले.

याकडे कोणाचेही लक्ष्य नाही यामध्ये मनुष्यबळी गेल्यानंतर यांना जाग येणार का असा सवाल सध्या उद्भवत आहे.दीलीप बिल्डकोन या डंपर चालकाला महापालिकेने जाब विचारुन मुरुम आणि माती ही झाकून घेऊन जाण्यास सांगितले पाहिजे.आर.टी.ओ चा नियम आहे पण तसे चित्र दिसून येत नाही.तसेच नागरिकांतून ही मागणी होत आहे की जोपर्यंत पावसाळा संपत नाही तोपर्यंत ह्या पुलाचे काम बंद रहावे अन्यथा या चिखलामुळे अनेक अपघात होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -