ताजी बातमी ऑनलाईन टीम
नवी दिल्ली : अनधिकृतरित्या कामावर गैरहजर राहिल्याबाबत एका सरकारी कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले होते. या प्रकरणात सर्वोच्च न्यायलयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे की, वारंवार ऑफीसला दांडी मारणे किंवा अनधिकृतरित्या रजेवर जाणे हे चुकीचे आहे. मात्र त्यासाठी कर्मचाऱ्याला बडतर्फ केल्यास ही अत्यंत कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे या कर्मचाऱ्याला कामावरून न काढता त्याला सक्तीची सेवानिवृत्ती (Retirement) देण्यात यावी असे न्यायालयाने म्हटले आहे.
त्याला सक्तीची सेवानिवृत्ती दिल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना पेन्शचा लाभ देखील देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. खाण मंत्रालयाच्या वतीने 100 दिवसांपेक्षा अधिक काळ अनधिकृत रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिला आहे.