इंटरनेट सेंसेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच आपल्या लूकमुळे चर्चेत असते. आपल्या अतरंगी स्टाइलमुळे तिचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्फी नेहमीच आपल्या आउटफिटसोबत एक्सपेरिमेंट करत असते. ज्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. मात्र याकडे ती अजिबात लक्ष देत नाही. दरम्यान रणवीर सिंहने (Ranveer Singh )उर्फीचे कौतुक केले होते. यानंतर तिचा आनंद गगनात मावत नाहीये. तिने रणवीरविषयी केलेल्या वक्तव्यामुळे तिची सगळीकडे चर्चा सुरु आहे. नुकत्याच दिलेल्या एका वक्तव्यात उर्फीने रणवीरला प्रपोज केले आहे.
काय म्हणाला होता रणवीर?
कॉफी विद करण शोमध्ये (koffee with karan) रणवीरला करणने जोहरने (karan johar) प्रश्न विचारला होता. करण म्हणाला होता की, कोणासाठी खुप लवकर सेम कपडे घालणे भयानक स्वप्नापेक्षा कमी नसेल? या प्रश्नाचे उत्तर देत अॅक्टरने तत्काळ – उर्फी जावेद! असे म्हटले होते. तसेच तिचे कौतुक करत त्याने ती एक फॅशन आयकॉन (fashion icon)असल्याचे देखील म्हटले होते. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट (Alia bhatt)एकत्र या शोमध्ये आले असताना त्याने हे वक्तव्य केले होते.
काय म्हणाली उर्फी?
उर्फी जावेदने आपल्या एका वक्तव्यात रणवीर सिंहची दुसरी बायको होण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. उर्फी जावेद ब्लॅक कलरच्या ट्रान्सपरेंट कपड्यांमध्ये बाहेर निघाली होती. तेव्हा पॅपराजींसोबत बोलताना ती म्हणाली की, ‘I Love Ranveer आणि कधी त्याला दुसरी वाइफ हवी असेल… तसे तर दीपिकानंतर त्याला कुणी लागणारच नाही. पण हवी असेलच तर मी त्याची दुसरी वाइफ व्हायला तयार आहे.’